logo

होळीच्या दिवशी दोन लहान मुलांमध्ये वाद, नंतर दोन्ही गटांनी लाट्याकट्यांनी केले भांडणे त्यात १७ झाले जखमी,५ जणांना बुलढाण्यात उपचार सुरू……

इरफान शाह आयमा न्युज (बुलढाणा)‌:- मेहकर तालुक्यातील विठ्ठलवाडी येथे होळीच्या दिवशी दोन गटांमध्ये हाणामारी झाली या मध्ये १७ जखमी झाले होते यामधील ५ जखमींना बुलढाणा येथे दवाखान्यात मध्ये पाठवण्यात आले आहे सविस्तर वृत्त अशे की मेहकर तालुक्यातील विठ्ठलवाडी या गावात मध्ये दोन लहान मुलांमध्ये किरकोळ भांडण झाले त्या मुलांनी आपापल्या घरी जाऊन वडिलांना याची माहिती दिली त्यानंतर दोन्ही मुलांच्या वडिलांनी भांडण करण्यास सुरुवात केली हे भांडण पाहता पाहता याचा वाद वाढतच गेला त्यात गावात मध्ये लाटाकाठ्यांनी भांडेणे चालू झाली यामध्ये गावातील नागरिक जखमी सुद्धा झाले जखमींना मेहकर येथील रुग्णालयात भरती करण्यात आले असून पाच रुग्णांना गंभीर मार लागल्यामुळे त्यांना बुलढाणा येथे हलवण्यात आले आहे. विठ्ठलवाडी येथील गावातील भांडणाची माहिती डोणगाव पोलिसांना पडताच त्यांनी विठ्ठलवाडी गावात धाव घेतली परिस्थिती एक छावणीचे स्वरूपच तयार झाले होते सध्या गावात मध्ये शांतता असून विठ्ठलवाडी गावात पोलिसांचे दंगाकाबूपथक सुद्धा पोचलेले आहे डोणगाव पोलीस स्टेशन मध्ये दोन्ही कडील नागरिकांनी डोणगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी केल्या आहे .

0
124 views